परवा गौरव आणि सम्पन्नशी बोलतांना एका जुन्या रचनेची आठवण झाली. IISc , CEDTत असतांना बरेच nightouts व्हायचे. तशाच एका nightout नंतर मजा म्हणून काही ओळी लिहिल्या होत्या. आज घरी शोधल्यावर एका वहीत ती रचना लिहिलेली सापडली. एक timepass आठवण म्हणून इथे post करतो. :D
एक विश्व!
Lab च्या एका खुर्चीवर, दमून थकून बसतांना
समोरच्या लाकडी कुशीवर, डोकं माझं तेकावतांना
सकाळचे, किमान ४-५ तरी, वाजले असतात जेव्हा
निर्जीव सारे जिवंत, lab मध्ये होतात तेव्हा.
का नावडतो तुला तो transistor ?
तीन पायांवर एक छोटासा घर!
त्या घरात राहतात लोक अनेक
current लागल्यावर पळतात सगले, न दोन न एक!
धमाल उड़ते सगल्यांची तेव्हा, चांगलीच!
कामी येतो transistor, असो amplifier किंवा switch
पण त्यात पण त्यांचे प्रकार किती! बाप रे बाप!
लक्षात ठेवतांना वाटतं, 'डोक्याला नुसता ताप!'
"काय करायचे रे दादा?", विचारतात ते मलाच
circuit चालायला लागल्यावर, प्रत्येक transistor वाटतो अगदी आपलाच!
त्या transistorच्या आत सुद्धा आहेत बरेच fundae ,
काम न धंदे, कुठून येतात असले बन्दे!
आधी वाटायचं ...
काही railway stations अच् फ़क्त, junctions असतात
हे ऐकून transistorच्या आतले, रहिवाशी हसतात
ते म्हणतात,
"आमच्यात पण junctions p-n म्हणून असतात,
ज्या दारांमुले, घरातल्या खोलीत लोक अडकतात.
मग voltage दादा आल्यावर हे दार उघडतात
हसत, खेळत, एका खोलीतनं दूसर्या खोलीत,
लोक नव्या जोमाने फिरतात..."
मला तर वाटतं,
junctionच्या दोन बाजुला शेत आहेत दोन
जणू एका boundaryच्या प्रत्येक बाजूला, एक वेगलाच zone
एका शेतात सूर्यफुले उगवली आहेत,
तर काल्पनिक चंद्रफुले आहेत दूसर्या बागेत
दोन्ही कढची फुलं, इकडे तिकडे बघत असतात
आतुरतेने सूर्याची व चंद्राची वाट पाहत असतात
जेव्हा सूर्य नी चन्द्र, पलिकडच्या शेतावर उगवतात
सगळी फुलं त्या त्या दिशेला फिरून,
वेड्यासारखी पलायला लागतात!
डोळ्यांसमोर हे दृश्य जेव्हा मी बघत बसतो,
मनातल्या मनात मी, मजेत मस्त हसतो!
ह्या एक-एका घराने बनतात,
अनेक societies, colonies आणि शहर
ICs मध्ये तर ह्यांच्या संख्येचा होतो नुसता कहर
मग development boards सारे civilizations सारखे दिसतात
पार आकाशातून काढलेल्या, satellite images सारखे भासतात
मग त्या शहरात सुद्धा असतीलच की, आपल्या सारखे institutes !
तेथे पण मुलांना मिळत असतील, असंख्य assignments आणि tuts !
memories मध्ये तयार होऊन मुलं बसत असतील
आपली संधि कधी येते, ह्याची वाट पाहत असतील
processor मग बोलावणार प्रत्येकाला अधून मधून
"मला job लागला रे लागला!", सांगत असतील ते नाचून!
Buses असतील शहरात, इकडून तिकडे जायला
त्यांत पण solid गर्दी, होत असेल, चमायला!
आणि जातांना कोणाचा धक्का लागलाच जर चुकून,
की म्हणत असतील, "मेल्या! का येतोस मरायला!"
processor आणि memory सवाल fastest !
आणि रस्ते सुद्धा रुंद, सरळ आणि BEST !
Controllers असतील अनेक तिथल्या सरकारच्या under
एकही बंद पडला, की समझा झालाच blunder
आत बाहेर करायला, असतील ports चारीकडे
मग जहाजातन जातील लोक peripheralsकडे
ह्या शरात सुद्धा असतील mafias and thugs !
ज्यांना लोक म्हणत असतील viruses and bugs
Debugger ने त्यांना काढल्यावर मग
आपली पूजा करत असेल, तिथला सारा जग!
आपलं पण जग, देवाला असच दिसत असेल
जेव्हा आपल्यासारखा nightout तो पण मारत असेल...
-Vindy
(व्याकरण चुकल्यास आणि typos बद्दल क्षमस्व :) )